
कणकवली : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची राजकीय वाटचाल भरभराटीची व्हावी व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी उपजिल्हाप्रमुख शेखर राणे व तालुका समन्वयक सुनील पारकर यांच्या वतीने कणकवली स्वयंभू मंदिरामध्ये सोमवारी सकाळी दुग्धाभिषेक करून लघुरुद्रपूजा आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने आजच्या दिवशी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. त्यानिमित्त कणकवलीत देखील बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी लघुरुद्र पूजेचे आयोजन केले होते. त्यानंतर कणकवली बस स्थानकात उपस्थित नागरिकांना जिलेबी वाटप देखील करण्यात आले. तसेच सविता आश्रम येथे देखील जिलेबी वाटप करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, संदेश पटेल, भूषण परुळेकर, जिल्हा उपाध्यक्ष शेखर राणे, तालुका समन्वयक सुनील पारकर, यांच्यासह बहूसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.