
वैभववाडी : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री श्री.भोसले हे दोन दिवसीय सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला भेट दिली. या दरम्यान पणन महासंघाच्या कोकण विभागाच्यावतीने श्री रावराणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.