
मुंबई : ज्या नागरिकांना मंत्रालय व शासकीय कार्यालयात येणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेला उपक्रम म्हणजेच "जनता दरबार" आज राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. लोकांच्या अडचणी सोडविणे याला प्राधान्यक्रम असून आज बाळासाहेब भवन, मुंबई येथे जनता दरबारच्या माध्यमातून राज्यातील शेकडो नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडविता आल्या, याचे समाधान आहे, असे उदय सामंत ह्यांनी म्हटले.