मंत्री रवींद्र चव्हाणांचं पदाधिकारी - कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Edited by: लवू परब
Published on: June 11, 2024 13:33 PM
views 73  views

दोडामार्ग : कोकण विभाग पदवीधर निवडणुकी संदर्भात आज सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दोडामार्ग येथे भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. यावेळी पदवीधर निवडणुक आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या  पाश्वभूमीवर चर्चा केली तसेच उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांना जोमाने काम करण्याचे आदेश दिले.

मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, आपले उमेदवार  ऍड. डावखरे यांना जास्तीत जास्त मते कशी मिळावीत यासाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. जे मतदार आहेत त्यांची मते आपल्याच कशी मिळणार याची तयारी करण्यासाठी गरजेचे आहे. प्रत्येक मतदाराशी संपर्क साधणे अंत्यत महत्वाचे आहे.  शिवाय त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणेही गरजेचे आहे. मतदान कसे करावे मतदानाची नेमकी कशी प्रक्रिया असेल याबाबतही मंत्री चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी दहावीत प्रथम आलेल्या कळणे येथील पालवी लक्ष्मण मेस्त्री हीचाही सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी भाजप कार्यालय येथील बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जि. प. माजी उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, तालुका अध्यक्ष सुधीर दळवी, माजी नगराधक्ष संतोष नानचे, एकनाथ नाडकर्णी, बांदा माजी सरपंच अक्रम खान, मकरंद तोरस्कर, रमेश दळवी, नगरसेवक राजू प्रसादी,  रामचंद्र ठाकूर, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, आनंद तळणकर, रंगनाथ गवस, भैया पांगम, नगरसेविका संध्या प्रसादी, गौरी पार्सेकर, मृणाली म्हावळणकर, क्रांती जाधव,स्नेहल गवस, दिक्षा हरमलकर, रुक्मिणी नाईक, माजी उपसभापती बाळा नाईक, दीपक गवस, देवेंद्र शेटकर समीर रेडकर, वैभव फाटक, शुभम गवस, सुशांत राऊत, मिलिंद नाईक, ॲड. अनील निरवडेकर आदी उपस्थित होते.