मंत्री राणेंनी बाबासाहेबांना केलं अभिवादन..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 14, 2024 06:01 AM
views 158  views

कणकवली : स्वातंत्रता, समता व बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करणारे, समाजसुधारणेचे अग्रणी, अर्थतज्ज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली बस स्थानक नजीक असलेल्या बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून पवित्र स्मृतीस भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अभिवादन केले. देशाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्याच संविधानाच्या आधारावर देश प्रगतीकडे मार्गक्रमण करत आहे. अशा शब्दात अभिवादन केले. यावेळी आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संजय कदम, नंदू पवार, गोठोस्कर, सुनील तांबे, किरण जाधव, कमलेश नरे, मालोजी कोकरे व अन्य उपस्थित होते.