वाढदिवस नारायण राणेंचा ; सोहळ्याला मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांची असेल उपस्थिती

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 09, 2026 17:22 PM
views 35  views

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित राहणार आहेत. राज्यातले महनीय व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक कार्याचा उहापोह होणार  आहे. कोकणाच्या विकासासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचा गौरव यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार आहे.

या सोहळ्यासाठी राज्यभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.