उन्हाळी सुट्टीबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गोंधळ !

शिक्षणमंत्री काय घेणार निर्णय ?
Edited by: भरत केसरकर
Published on: May 01, 2024 06:27 AM
views 2321  views

कुडाळ : महाराष्ट्रात सर्व माध्यमिक शाळांना उद्या दोन मे पासून उन्हाळी सुट्टी सुरू होत आहे.  मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच शाळांना सहा मे पासून सुट्टी सुरू होत आहे. या गोंधळाबाबत दीपक केसरकर यांना काल रात्री उशिरा विचारले असता आपण याबाबत आयुक्तांकडून माहिती मागून घेऊन या संदर्भात जर चुकीचे आदेश दिले असतील ते बदलून शाळांना दोन मे पासूनच सिंधुदुर्गातील शाळांना सुट्टी देण्यात येईल अशा प्रकारची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.

सध्या कडक उन्हाळा असून विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याची सवलत दिली होती. हा कडक उन्हाळा लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने दोन मे ते 14 जून पर्यंत शाळांना सुट्टी दिली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होणार आहे. तर विदर्भाबाबत या शाळांची सुट्टी जून अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना या 6 जून पासून सुट्टी असणार आहे. त्यामुळे मतदानासाठी आपल्या आपल्या गावी जाणाऱ्या शिक्षकांची चांगलच  धांदल होणार आहे. तर सिंधुदुर्गात अशी सुट्टी का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

याबाबत दीपक केसरकर यांना विचारले असता त्यानी तत्काळ निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. शिक्षण विभागाच्या गोंधळामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल  झाले आहेत.दिपक केसरकर शालेय प्रशासनास काय आदेश देतात? आणि सुट्टी मध्ये बदल होणार का?याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व विद्यार्थी वर्गाचे लक्ष्य लागून राहिले आहे.