खोक्रलच्या दोन्ही पुलांचं अखेर भूमिपूजन

मंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर यांचे सरपंच शेटकर यांनी मानले आभार
Edited by: संदीप देसाई
Published on: March 04, 2023 22:02 PM
views 238  views

दोडामार्ग : खोक्रल गावासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या दोन्ही पूलांच्या बांधकामाचे भूमिपूजन खोक्रल गावचे जेष्ठ ग्रामस्थ व देवस्थान समितीचे अध्यक्ष पांडुरंग गवस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आल.गेल्या वीस वर्षांपासून खोक्रल गाव व अलीकडे नावारुपास आलेले पर्यटन स्थळ मांगेली या गावांना जोडणाऱ्या खोक्रल ते उसप रस्त्यावर असलेल्या कॉजवेच्या उंची कमी होत्या. त्यामुळे या मार्गावरील पावसाळ्यात वाहतूक बंद होऊन संपर्क तुटत होता. या ठिकाणी नवीन पुल बांधकाम करावे, अशी मागणी या मतदारसंघाचे आमदार शिक्षण मंत्री दिपक केसरकर व राज्याचे बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे सरपंच देवेंद्र शेटकर व ग्रामस्थानी केली होती. अखेर या पुलाला मंजुरी मिळाली. नुकतेच या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन खोकरल गावचे जेष्ठ ग्रामस्थ व देवस्थान समितीचे अध्यक्ष पांडुरंग गवस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आल.

 यावेळी खोक्रलचे सरपंच देवेंद्र शेटकर, उपसरपंच सौ. अंजू महादेव गवस, उपसरपंच गोपाळ नाईक, ग्रामपंचायत सदस्य भरत गवस, सागर नाईक, दत्ताराम गवस, गोविंद गवस, सुरेश गवस, रवींद्र गवस, कृष्णा गवस, गंगाराम गवस, नवनाथ गवस, कृष्णा गवस, साईनाथ गवस, रोहित कणकुबकर, प्रमोद गवस, गिरीश गवस, शुभम गवस, पांडुरंग गवस, अमित गवस, सोनम नाईक, साधना गवस, कॉन्ट्रॅक्टर शिवांणा, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता संभाजी घंटे उपस्थित होते.


खोक्रल येथे पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करताना अध्यक्ष पांडुरंग गवस सोबत सरपंच देवेंद्र शेटकर, उपसरपंच सौ. अंजू महादेव गवस, माजी उपसरपंच गोपाळ नाईक, ग्रामपंचायत सदस्य भरत गवस, सागर नाईक, दत्ताराम गवस, गोविंद गवस, सुरेश गवस, रवींद्र गवस, कृष्णा गवस, गंगाराम गवस, नवनाथ गवस, कृष्णा गवस, साईनाथ गवस, रोहित कणकुबकर, प्रमोद गवस आदी