पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 23, 2025 19:53 PM
views 145  views

सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  

शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भक्ति मंगल कार्यालय कट्टा गुरामवाडी ता. मालवण येथे आगमन व माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी  11.30 वा: नदीपत्रातील गाळ काढणेबाबत आढावा बैठक. (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस) दुपारी 4 वा:  रस्त्याचे भूमीपूजन,(टेंबवली स्टॉप ते गावठण, ता. देवगड) कार्यक्रमानंतर देवगड येथून रत्नागिरीकडे प्रयाण.  रात्री 10 वाजता कणकवली येथे आगमन व राखीव.