नौका मालकांचं मंत्री नितेश राणेंना निवेदन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 21, 2025 19:06 PM
views 27  views

देवगड : देवगड तालुक्यातील तांबळडेग - मोर्वे खाडीमुखात गाळ साचल्याने येथील मच्छीमारांना मासेमारी नौका समुद्रात घेऊन जाणे येणे धोक्याचे बनले आहे. या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार वस्ती आहे. तांबळडेग - मोर्वे अन्नपूर्णा खाडी मुखवार दोन्ही बाजूने बंधारा होणे अपेक्षित आहे. तांबळडेग आणि मोर्वे गावातील नौकामालक तसेच मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप. सोसायटीचे पदाधिकारी यांनी याबाबत सोमवारी मस्त्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर भेट घेऊन लेखी निवेदन दिले आहे. संबंधित बंदर विकासाचे काम आपल्या माध्यमातून पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले आहे. 

यावेळी मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप. सोसायटीचे उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सहदेव कोचरेकर, सचिव तथा माजी उपसरपंच काका मुणगेकर तांबळडेग माजी सरपंच जगदीश मालडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक कुबल, मधुकर धावडे, हिंदळे मोर्वे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र बापर्डेकर, हिंदळे मोर्वे ग्रामपंचायत माजी सदस्य प्रकाश तळवडकर, निखिल तारी, रघुनाथ गांवकर, अरविंद सारंग, श्रीरंग केळुसकर, श्रीदेव विठ्ठल रखुमाई देवस्थान अध्यक्ष महादेव कोचरेकर, जितेंद्र मालडकर, संजय कोंयडे, स्वप्नील बापर्डेकर,सदाशिव कुबल, गंगाधर गांवकर, गोरक्षनाथ बापर्डेकर, बबन सनये, अजय धुरत, दत्तविजय कुबल, विष्णू धावडे, मंदार सनये, महेश तारी, पंडित गांवकर, विलास बापर्डेकर, रामदास कोळंबकर, तुलशीदास कोळंबकर, रामदास धुरत, राजेंद्र लोणे, गणेश चिंदरकर, धनाजी धुरत, गणपत धुरत, कमलेश कुमठेकर, किशोर ढोके, निलेश प्रभू आदी मच्छिमार उपस्थित होते.