
सावंतवाडी : आंबोली येथील हिंदू धर्म परिषदेला महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री मंत्री नितेश राणे यांनी संबोधित केले. हिंदू असल्याचा गर्व आपल्याला असला पाहिजे. धर्माभिमान बाळगून कडवटपणे धर्माच रक्षण केलं पाहिजे असं मत मंत्री नितेश राणेंनी यावेळी व्यक्त केल.
आंबोली येथील हिंदू धर्म परिषद परिषदेत परमानंद महाराज व अवधूतानंद महाराज यांनी मंत्री नितेश राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यानंतर नितेश राणेंनी उपस्थितांना संबोधित केलं. परकीय आक्रमणातून हिंदूवर होणारे हल्ले बघता धर्म म्हणून एकत्र येऊन धर्मरक्षणाच आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदू व्यक्तीने कडवटपणे पुढे येणे गरजेचे आहे. छत्रपती शिवराय जन्माला यावे मात्र ते शेजारच्या घरात हे मत असता कामा नये. आपल्या धर्माकडे, मंदिराकडे व गोमातांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होता कामा नये यासाठी प्रत्येकाने हिंदू धर्मरक्षक व्हायला हवे असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी जि प शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, गाव प्रमुख रामचंद्र गावडे, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, दिनेश गावडे, जिल्ह्यातील नऊ मठांचे अध्यक्ष बाळकृष्ण देसाई, सचिव राजेश सावंत आदींसह भाविक व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप लांजवळ व सूत्रसंचालन अक्षय सातोस्कर यांनी केले.
यावेळी मठाचे गुरु परमानंद महाराज यांनी मंत्री नितेश राणे यांना निवेदन दिले. त्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील देवस्थाने पश्चिम महाराष्ट्र समिती मध्ये येतात त्यामुळे इथल्या देवस्थानांचा विकास करण्यासाठी अडचणी येतात तसेच निधी मिळत नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी वेगळे मंडळ स्थापन करावे आणि निधी द्यावा असे परमानंद महाराज यांनी निवेदन दिले.त्यांच्याहस्ते सत्कार ही करणतात आला. तर येथील स्वामी समर्थ मठात सुशोभीकरण करण्याची मागणी उल्हास गावडे यांनी केली.