'सेवा पंधरवडा' कार्यशाळेस मंत्री नितेश राणे मार्गदर्शन करणार

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 10, 2025 11:20 AM
views 107  views

सिंधुदुर्गनगरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान देशभरात सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग भाजपाची या अभियानाची जिल्हा कार्यशाळा गुरवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० - ३० वाजता ओरस सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यालय ( वसंतस्मृती ) येथे आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेस पालकमंत्री नितेश राणे  व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे मार्गदर्शन करणार आहेत .

या कार्यशाळेत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, दिव्यांगांचा सन्मान , क्रीडा स्पर्धा , मान्यवरांचा सत्कार, दिव्यांगांना उपकरणांचे वाटप यांसारखे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याबाबत नियोजन केले जाणार आहे.

तसेच यावेळी बूथ स्तरावर हे कार्यक्रम कसे प्रभावीपणे राबवावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार असुन , सेवा पंधरवड्यात अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचून समाजोपयोगी कार्य करण्याचे नियोजन या कार्यशाळेत होणार आहे .

या कार्यशाळेला भाजपाचे राज्य परिषद सदस्य व जिल्हा विषेश निमंत्रित , जिल्हा व मंडल सेवा सुशासन समिती, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व मंडल महामंत्री, मोर्चा  / आघाडी जिल्हाध्यक्ष अपेक्षित असुन अपेक्षितांनी कार्यशाळेत वेळेवर व पूर्णवेळ उपस्थित रहावे असे आवाहन या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले आहे.