मंत्री नितेश राणे 11 सप्टेंबरला रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 10, 2025 12:41 PM
views 329  views

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना.नितेश राणे हे गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर  दौऱ्यावर येत आहेत.

गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचे रत्नागिरीत आगमन होईल. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेड या कंपनीचे अधिकारी आणि काजू महामंडळाच्या संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जयगड पोर्ट जयगड येथे होणार आहे.

त्यानंतर सकाळी 9.45 वा. भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालय कोतवडे याचं उद्घाटन होणार असून हे उद्घाटन ना. नितेश राणे यांच्या हस्ते कोतवडे येथे होणार आहे. त्यानंतर ना. नितेश राणे हे सिंधुदुर्ग कडे प्रयाण करतील. तिथे दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यक्रमास  ओरोस येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालय येथे ते उपस्थित राहणार आहेत. असा त्यांचा दौरा आहे.