कणकवली : कणकवली बुध्दविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नवनिर्वाचित मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पुष्पहार अर्पण करत शनिवारी अभिवादन केले. त्यानंतर बुध्दविहार मधील गौतम बुध्द , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, भाजपा मागास सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, किरण जाधव, माजी नगरसेवक गौतम खुडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.