अंदर की बात है, दीपक भाई हमारे साथ है

मंत्री नितेश राणे सावंतवाडीत कडाडले
Edited by: विनायक गांवस
Published on: November 25, 2025 12:44 PM
views 37  views

उदय सामंत, संजू परबांवर बरसले 


ट्रेलर भारी,  पिक्चर काय असेल 


सावंतवाडी : मराठी शिकण्यासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले मेहनत घेत आहेत‌. कमी काळात त्यांनी घेतलेली मेहनत बघता पुढच्या पाच वर्षात त्या शहराचा कायापालट करतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. आमच्या पॅनेलमध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर देखील आहेत. संपूर्ण पॅनल बघता यापेक्षा चांगले उमेदवार असू शकत नाहीत‌. सावंतवाडीकर म्हणून पाच वर्ष नेतृत्व कोण करणार, समस्या कोण सोडवणार, १८ प्रकारच्या नागरिक सुविधा देण्याची क्षमता कोणात यांचा विचार करून मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. 


श्री‌. राणे म्हणाले, ही निवडणूक सावंतवाडीच्या अस्मितेची, स्वाभिमानाची आहे‌‌. युवराज्ञी व राजघराण्याच अतुट नातं आहे. शहराला खरी ओळख राजघराण्यान दिली आहे. लोकांची गरज ओळखून रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्याचा विचार राजघराण्यान केला. दुरदृष्टी ठेवून चांगल शहर निर्माण करण्यासाठी नियोजन केलं आहे‌. मुलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांनी निरपेक्ष भावनेने विचार केला. तेव्हा हा विचार केला नसता तर आज ही परिस्थिती असती का ? हा प्रश्न आहे. त्यामुळे आज राजघराण्याची परतफेड करण्याची वेळ आहे. म्हणून, राजघराण्याला नगराध्यक्षपदासाठी संधी दिली. सगळ्या राजकीय पक्षांकडून सावंतवाडीकर म्हणून विचार होईल अशी अपेक्षा होती. समोरून कोणी अर्ज दाखल करता नये होता. प्रतिस्पर्धींची वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटत आहे. राजघराण संपलं हा शब्द वापरला जातोय. मदत मागताना हा शब्द आठवला नाही ? तेव्हा का ताठ भुमिका नाही घेतली ? असा सवाल मंत्री राणेंनी केला. राजकारण २ डिसेंबर पर्यंत आहे. मात्र, हेच घराण इथे असणार आहे. राजघराण आपला स्वाभिमान, अस्मिता आहे. आपल्या घरात माता-भगिनी आहेत याचाही विचार केला पाहिजे. दीपक केसरकर यांच आश्चर्य वाटलं. ते पाठींबा देतील अस वाटल होत. राजघराण्याच्या आशीर्वादा शिवाय न बोलणारे केसरकर आता का बोलले नाहीत ? पाठिंबा का दिला नाही असा सवाल त्यांनी केला. राजकारण, समाजकारण प्रतिष्ठेशिवाय मोठा असता नये. उमेदवार उभा केला तरी दीपक केसरकर यांचा पाठिंबा श्रद्धाराजेंना आहे असा दावा त्यांनी केला. श्रद्धाराजेंना मत म्हणजे दीपक केसरकरांना मत आहे. ये अंदर की बात है, दीपक केसरकर हमारे साथ है ! आज व्यासपीठावर देखील दिसले असते. त्यामुळे ही निवडणूक राजकारणाची नाही, परतफेड करण्याची आहे. पुढच्या पिढीला माणूसकी शिकवण्याची ही निवडणूक आहे. राजघराण्यासह उभं राहण्याची ही निवडणूक आहे. २ तारखेला काहींचा कार्यक्रम करू, पोटनिवडणुकी नंतर काहींचे संस्कार कळलेत. युवराज्ञींच व्हिजन शहर विकासाच आहे. भाजपच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तुम्ही फक्त भाजपला आशीर्वाद द्या. पालकमंत्री मी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. भरघोस निधी सावंतवाडी शहराला देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


उदय सामंत निधीसाठी पालकमंत्र्यांकडे जाऊ म्हणाले. त्यामुळे बायपास पेक्षा थेट पालकमंत्र्यांना मतदान करा. चाव्या माझ्या खिशात आहेत. आचारसंहिता असल्याने काढू शकत नाही. पण, पुढे माझ्याकडे त्या असणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयात पर्मंनंट डॉक्टर, मशिनरी आणून ठेवतो. गोवा बांबोळीला जायची गरज भासणार नाही असा शब्द त्यांनी दिला. मल्टीस्पेशालिटीसाठीवर मार्ग काढू, स्थानिक डॉक्टरांचीही चिंता आहे. आय लव्ह सावंतवाडी म्हणणाऱ्यांनी राजघराण्याच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना जनता पेटून उठल्यावर काय होत ते दाखवून द्या असही आवाहन त्यांनी केलं. तिनदा कमळ दाबा, सगळं पॅनेल निवडून द्या असं आवाहन त्यांनी केले.