
दोडामार्ग : विकासकामे करण्यासाठी निधी आणावा लागतो. मात्र, ज्यांना विकासनिधी आणायला जमत नाही अशि लोक दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेत असतात. त्यामुळे आपण सर्व महायुतीच्या घटकांनि जसे लोकसभेत एकत्र येऊन काम केल, तस आता येणाऱ्या विधानसभेत एकत्र राहून काम करूया त्यांनंतर विरोधकांना फुक्याचे नारळ फोडायला येउदे असा टोला महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी राजन तेलींना लगावला.
आपल्या आतापर्यंतच्या आमदारकीच्या टर्ममध्ये प्राप्त झालेल्या मोठ्या निधीपैकी सर्वात जास्तीत जास्त निधी हा या खेपेस दोडामार्गला मी दिलेला आहे. या निधीच्या माध्यमातून दोडामार्ग शहरात तसेच तालुक्यातील गावागावांमध्ये अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहेच त्याचबरोबर राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी दोडामार्ग तालुक्याचाही महत्त्वाचा वाटा ठरेल असा ठाम विश्वास शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी केला.