
दोडामार्ग : साटेली भेडशी येथील चंद्रावती दत्ताराम नाईक, संतोष नाईक यांचे राहते घर दोन दिवसांपूर्वी जमीनदोस्त झाले होते. त्याची पाहाणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली व खास बाब म्हणून तात्काळ घरकुल मंजूर करा अशे आदेश येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिले. दोडामार्ग तालुक्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीत साठेली भेडशी येथील चंद्रावती नाईक यांचे राहते घर पडले होते.
त्याचे राहते असलेले घर हे पूर्णपणे जीर्ण झाले होते. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान आवास योजनेमधून त्यांनी दोडामार्ग पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, त्यांचा आवास योजने अंतर्गत तो प्रस्ताव मंजूर झला नाही. आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसात त्यांच घर जमीनदोस्त झाले. यावेळी त्यांनी पंचायत समिती व शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
त्याच पार्श्वभूमीवर रविवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांनी सक्त सूचना केल्या व खास बाब मधून तात्काळ घरकुल मंजूर करून द्या असे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार, बिडीओ सावंत, महसूलचे कर्मचारी, तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, राजेंद्र निंबाळकर, संजय गवस, गोपाळ गवस, गुरूदास सावंत, मायकल लोबो, समीर देसाई, नंदू टोपले, भरत दळवी, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी आदी उपस्थित होते.