सपतनाथ मंदिराला मंत्री केसरकरांनी दिली भेट...!

Edited by: विनायक गावस
Published on: March 10, 2024 12:48 PM
views 29  views

सावंतवाडी : सरमळेवासियांनी भाविकांच्या सहकार्याने पांडवकालीन सपतनाथ मंदिर एका रात्रीत बांधून पांडवकालीन इतिहासाची पुनरावृत्ती केली. त्यामुळे भाविकांचे अनेक वर्षांपासूनचे एका रात्रीत मंदिर बांधण्याचे स्वप्न साकार झाले असून यातून सरमळेवासियांची एकजूट दिसून आली असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.मंत्री दीपक केसरकर यांनी सरमळे येथे एका रात्रीत बांधण्यात आलेल्या सपतनाथ मंदिराला भेट देत सपतनाथचे दर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनायक दळवी सरमळे सरपंच विजय गावडे, भालावल सरपंच समीर परब, शिवसेना माजगाव विभाग प्रमुख उमेश गावकर, सरमळे शाखाप्रमुख संजय गावडे, देवस्थान मानकरी विठ्ठल गावडे दाजी गावडे, नाना गावडे, श्री गावडे, अविनाश गावडे, मंगेश सावंत, राकेश गावडे, विश्वजीत गावडे, सागर गावडे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी दीपक केसरकर यांनी बांदा - दाणोली या सह्याद्री राज्यमार्गावर सपतनाथ मंदिर असल्यामुळे तीर्थक्षेत्रिय पर्यटनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून त्यांनी यासाठी एक लाख रुपयाची देणगी जाहीर केली. तसेच सपतनाथ मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला २५ हजार रुपयाची देणगी दिली.