पाळयेत मंत्री केसरकरांनी दिला २० लाखांचा निधी

Edited by: संदीप देसाई
Published on: December 20, 2023 18:04 PM
views 83  views

दोडामार्ग : पाळये गावच्या मुख्य रस्त्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यस्तरीय बजेटमधून 20 लाख मंजूर केलेल्या कामाचे भूमीपूजन शिवसेना ज़िल्हा समन्वयक शैलेश दळवी यांच्या हस्ते झालं. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुका संघटक गोपाळ गवस, रामदास मेस्त्री, भगवान गवस युवा प्रमुख, दादा देसाई उप तालुका प्रमुख, महीला आघाडी प्रमुख चेतना गाडेकर, विभाग प्रमुख मायकल लोबो, रामदास मेस्त्री, राधिका गडेकर, मनीषा गवस, सरपंच सुनीता गवस, केसरकर, लक्ष्मण दळवी, दयानंद राणे यांसह पाळये ग्रामस्थ उपस्थित होते.