बोवलेकर कुटुंबियांचं मंत्री केसरकर यांनी केलं सांत्वन

Edited by: विनायक गावस
Published on: July 28, 2023 19:02 PM
views 491  views

वेंगुर्ला : वेंगुर्ले मठ येथील रहिवासी, रोहित स्पोर्टस् क्रिकेट क्लब वेंगुर्लेचे मालक आणि बोवलेकर कॅश्युचे संचालक रोहित बोवलेकर यांचे मंगळवार (२५ जुलै) रोजी निधन झाले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केल.

रोहित यांना क्रिकेट खेळाची प्रचंड आवड होती. या आवडीतूनच त्यांनी स्वतःच्या मालकीचा रोहित स्पोटर्स् क्रिकेट क्लब स्थापन केला होता. राज्यातील अनेक नामवंत खेळाडूंचा त्यांच्या संघामध्ये सहभाग असायचा. त्यांच्या अकाली निधनाची वार्ता ही अत्यंत वेदनादायक आहे. या दुःखात सावरण्याचे बळ बोवलेकर कुटुंबियांना मिळो अशी भावना दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.