सिंधुदुर्ग राष्ट्रवादीची जबाबदारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 19, 2023 19:55 PM
views 111  views

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राज्यात नव्यानं संघटनात्मक बांधणी केली जात आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये पक्ष आणि संघटनवाढीची जबाबदारी देण्यात आली आहे.

यामध्ये मंत्री ना. हसन मुश्रीफ याच्याकडे कोल्हापूर, सिंधुदूर्ग, व अहमदनगर या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली.  सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली असल्याने भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी संघटना बांधणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.