मंत्री दीपक केसरकर अति हुशारच निघाले : शैलेश परब

Edited by: विनायक गावस
Published on: August 06, 2023 15:58 PM
views 711  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा लढव असे खुद्द पक्षप्रमुखांनी सांगूनही आपण दीपक केसरकर यांचे नाव पुढे केले त्यावेळी आपल्याला ही दुर्बुद्धी कुठून सुचली हे समजले नाही त्यावेळी त्यांनी दहशतवादाच्या विरोधात केलेले वातावरण पाहता ते हुशार आहेत असे वाटले परंतु ते अति हुशारच निघाले अशी टीका ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख शैलेश परब यांनी आज येथे केली.

तर  दीपक केसरकर सत्तेसाठी किती लाचार आहेत हे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागून धावताना उभ्या महाराष्ट्राने पाहिले त्यामुळे येणाऱ्या काळात ते निश्चितच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी टीका ठाकरे शिवसेना संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी आज केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव येथे सेवा  शेतकऱ्यांना खत वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पडते तालुकाप्रमुख रुपेश राऊळ बाळा गावडे चंद्रकांत कासार रमेश गावकर गुणाजी गावडे शब्बीर मणियार आधी पदाधिकारी उपस्थित होते.

श्री परब पुढे म्हणाले, 2014 साला सावंतवाडीची विधानसभा मला लढवण्याची संधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली होती परंतु आपण ती नाकारत दीपक केसरकर यांचे नाव समोर केले त्यावेळी त्यांनी सावंतवाडी मतदारसंघात दहशतवादाचे वातावरण निर्माण केले होते पण खुद्द त्यांना गोव्यातून त्यांना घेऊन आलो होतो परंतु ते स्वार्थासाठी पुढे मिंधे म्हणजे गटात केले मात्र त्यांनी केलेली गद्दारी येथील जनता कधीच विसरणार नाही येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जनता त्यांची जागा निश्चितच दाखवून देतील.

श्री राऊळ म्हणाले, केसरकारांनी सांगितलेले वेळ व दिलेला शब्द हा कधीच पाळला नाही ही त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्रात आहे आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी केसरकर हे किती धावतात हे आपल्याला देखील ठाऊक आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची जागा तुम्ही दाखवून द्या असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले 

आज राज्यात काय हुकूमशाही चालले हे उभा महाराष्ट्र पाहत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जर तुम्हाला सरकारची तिजोरीची चावी कोणाच्या हातात द्यायची असेल तर ती तुमच्या हातात आहे. बांदा परिसरात आलेली पूर परिस्थिती अद्याप दोन वर्षांपूर्वीची नुकसान भरपाई मिळाली नाही हे आपले दुर्दैव आहे.

यावेळी संजय पडते बाळा गावडे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.