
सावंतवाडी : शिवसेना नेते, माजी मंत्री दीपक केसरकर यांनी ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल होत त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. देवदर्शन निमित्त त्यांनी नाशिक येथे भेट दिली. केसरकर यांना पुन्हा मंत्रीपद मिळावे मिळावे म्हणून त्र्यंबकेश्वराकडे साकडे घालण्यात आले.
त्र्यंबकेश्वर मंदिर येथील महाआरतीत दीपक केसरकर यांनी सहभाग घेतला. त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त विश्वस्त सौ रुपाली भुतडा यांनी ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी मंदिरातील पुजारी तुंगार बंधू ,तसेच ट्रस्टचे अधिकारी समीर वैद्य व सहकारी उपस्थित होते. यावेळी त्रंबकेश्वर पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला होता.