
चिपळूण : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आमदार भरतशेठ गोगावले यांनी काल गुहागर बायपासवरील पागमळा येथे असलेल्या ‘तृप्ती मालवणी मच्छी खानावळ’ला सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी खानावळीत जेवणाचा आस्वाद घेतला आणि मालवणी चवांचे कौतुक केले. त्यांच्या स्वागतासाठी खानावळ मालक रुद्र सावंत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आत्मीयतेने पुढाकार घेतला. श्री. गोगावले यांनी खानावळीत उपलब्ध असलेल्या स्थानिक मच्छी पदार्थांची माहिती विचारून स्थानिक खाद्यसंस्कृतीविषयी विशेष रस दाखवला.
खानावळीत जेवणानंतर संवाद साधताना त्यांनी स्थानिक तरुणांनी व्यवसायात उतरून स्वबळावर यश मिळवावे, असा प्रेरणादायी सल्लाही दिला. यावेळी परिसरातील नागरिक आणि स्थानिक व्यावसायिकांनीही गोगावले यांच्याशी संवाद साधला.