
मालवण : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सपत्नीक राजकोट किल्ल्याला भेट दिली. हिंदवी स्वराज्यातील नौदल व्यवस्थेची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देऊन विलक्षण समाधान आणि ऊर्जा मिळाली. छत्रपती श्री. शिवाजी महाराज की जय! अशी प्रतिक्रिया फेसबुक पोस्टवर केली आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज मालवणात राजकोट किल्ल्याला भेट दिली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची पोस्ट
फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतर, त्याच्या रक्षणासाठी आणि समुद्र किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही लहान किल्ल्यांची उभारणी केली. मालवण येथील 'राजकोट किल्ला' हा त्यापैकीच एक.
हिंदवी स्वराज्याच्या नौदल व्यवस्थेचा भाग असलेल्या या किल्ल्याचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे होते. समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेसाठी त्याची भूमिका मोलाची होती.
या ऐतिहासिक किल्ल्याला पत्नी सौ. ज्योती समवेत भेट दिली. किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास वंदन करताना मनामध्ये अपार समाधान आणि अभिमानाची भावना होती.
छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य आणि प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, तसेच स्थानिक पर्यटनाचा विकास व्हावा, यासाठी महायुती सरकारने येथे 'शिवसृष्टी' उभारण्याचा संकल्प केला आहे.हिंदवी स्वराज्यातील नौदल व्यवस्थेची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देऊन विलक्षण समाधान आणि ऊर्जा मिळाली.
छत्रपती श्री. शिवाजी महाराज की जय!