दोडामार्ग : महाराष्ट्रा राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरूवारी सकाळी आपली सासरवाडी आसलेल्या दोडामार्ग तालुक्यातील घोटगे गावात कुटुंबीया समवेत उपस्थिती लावली. ग्रामदेवता श्री. देवी सातेरी व स्वयंभू श्री. देव धारेश्वर यांचे दर्शन घेतले. त्यांच्या पत्नीने माहेरची देवी सातेरी देवीची ओटी भरून नतमस्तक झाल्या. शेलार यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली व दोडामार्ग तालुक्यातील विकास कामासाठी माझी भरीव कामगिरी असेल असे अभिवचन त्यांनी दिले. यावेळी घोटगे गावच्या ज्येष्ठ मंडळी त्यांचा सत्कार केला.
मंत्री आशिष शेलार हे दोडामार्ग खासगी दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्या बाबत स्थानिक कार्यकर्त्यांना कोणालाच कल्पना नव्हती. मात्र, मंत्री आशिष शेलार दोडामार्ग घोटगे गावात येत असल्याचे वृत्त एक दोन तासांपूर्वी समजली. त्यानंतर काही भाजप कार्यकर्त्याची त्यांच्या आगमनाच्या स्वागतासाठी लगभग सुरू झाली. मंत्री आशिष शेलार हे नात्याने घोटगे गावचे जावई लागतात. घोटगे गावचे आबा दळवी यांचे होय. ग्रामदेवतेच्या वर्धापना दिना निमित्त वर्षातून एकदा ते दर्शनासाठी येतात. शेलार हे पत्नी, मुलगा सहित सहकुटुंब गुरुवारी सकाळी ते घोटगे गावात त्यांनी उपस्थिती लावली. घोटगे गावात त्यांचे आगमन झाल्याचे समजताच गावातील महिलांनी त्यांना औक्षण करून स्वागत केले. यानंतर देवी सातेरी दर्शन घेतले , देवीला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या पत्नीने देवीची ओटी भरली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी यथेच्छ चर्चा केली. ते म्हणाले आपण कुठलेही शुभ कार्य करताना देवाचे नामस्मरण पूजन करतो. कारण त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपली वाटचाल चालू असते. देवीचे आशिर्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. या गावचे आबा दळवी यांनी खुप काही या गावासाठी केले. त्यांचे कार्य कोणी विसरु शकत नाही.
घोटगे गावचे माजी सरपंच कै. मधुकर दळवी यांचे कार्य देखील या गावासाठी वरदान होते. असे गौरोदगार त्यांनी काढले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, कसई दोडामार्ग नगर पंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, घोटगे सरपंच सौ. भक्ती दळवी, आनंद तळणकर, दिपक गवस, पराशर सावंत, तसेच घोटगे गावचे मानकरी महिला उपस्थित होते.