येवा कोकण आपलाच आसा...मिनिप्लेक्सही आपलाच आसा !

कोकणच्या पारंपरिक कलांचे सादरीकरण एकाच रंगमंचावर
Edited by:
Published on: May 09, 2024 06:25 AM
views 526  views

मालवण : होय ! आपल्या मत्स्यगंधा समर्थ थिएटर येथे कोकणच्या दशावतार, कळसूत्री बाहुली, गजनृत्य या पारंपारिक कलांचे सादरीकरण रंगमंचावर सादर करीत आहोत. वरील सादरीकरण मे महिन्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी करण्याचे आयोजिले आहे. तसेच प्रेक्षकांच्या मागणीनुसार इतर दिवशी ही आयोजित करण्यात येणार आहे. 


ग्रुप बूकिंग कमीत कमी ४० - ४५ लोकांसाठी हा कार्यक्रम सवलतीच्या दरात ही आयोजित करण्यात येणार आहे. पारंपरिक कलांचे सादरीकरण या कार्यक्रमासाठी तिकिट दर रु. ४००/- प्रती व्यक्ति. मत्स्यगंधा समर्थ थिएटर नाटक व चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी आपल्या थिएटर मध्ये मागणीनुसार सर्व जूने चित्रपट (दोन महिन्या अगोदर रीलीज झालेले सर्व मराठी, हिन्दी, इंग्रजी चित्रपट) व सर्व जुनी नाटक चित्रफितीत सवलतीच्या दरात प्रक्षेपित करीत आहोत. कमीत कमी २०-२५ प्रेक्षकांची उपस्थितीत शो सुरू करण्यात येईल.

जो चित्रपट व नाटक प्रेक्षकांना मागणीनुसार पाहायचा असणार आहे. त्यांनी एक दिवस आधी चित्रपटाचे नाव व वेळ कळवणे गरजेचे आहे. कृपया प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी ही विनंती. सदर सभागृह मीटिंग, कॉन्फ्रेंस, वाढदिवस, साखरपुडा, लग्न व ईतर कार्यक्रमासाठी माफक दरात देण्यात येईल. तसेच destination wedding व लग्न समारंभा साठी संपूर्ण पॅकेज देण्यात येईल.

येवा कोकण आपलाच आसा... मिनिप्लेक्सही आपलाच आसा !

अधिक माहितीसाठी संपर्क करा : ७८२२००५५८५ / ९३७२९४५२३४ / ९४२२६८६९७५