मिनी महोत्सव उद्यापर्यंत..!

Edited by:
Published on: December 31, 2023 15:44 PM
views 232  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेलया सावंतवाडी मिनी महोत्सव १ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आला आहे. वस्तू आणि खाद्यपदार्थ स्टॉल्स यांवर असलेली प्रचंड गर्दी पाहता नागरिकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वप्रथम दिनांक 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत ठेवण्यात आला होता, परंतु महोत्सवाचा कालावधी १ जानेवारी पर्यंत वाढविण्यात आलाय. नववर्षाच्या स्वागतासाठी बेधुंद 2024 ऑर्केस्ट्रा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . बेधुंद 2024 ( गीत,नृत्य, मिमिक्री असा महाराष्ट्रा व गोव्यातील नावजेल्या गायक वादक आणि डान्सर)असा जल्लोष कार्यक्रम देखील होणार आहेत .

सोबतच सावंतवाडी तालुका मर्यादित फक्त दहा स्पर्धकांसाठी बेस्ट कपल 2024 ही स्पर्धा घेण्यात येणार आहे . तरी सावंतवाडीकरांनी या मिनी महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे . बेस्ट कपल 2024 स्पर्धेत नाव नोंदणीसाठी रवी जाधव व शरद पेडणेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलंय.