कोकणातील मिल कामगारांना मिळणार हक्काच घर

प्रमोद जठार यांचं आश्वासन
Edited by:
Published on: November 26, 2023 20:24 PM
views 438  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हातील मिल कामगाराना घर शासनाकडून मिळण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख (भाजपा)प्रमोद जठार माजी आमदार यांच्याकडे समस्या मांडला.मी देखील एक मिल कामगाराचा मुलगा आहे.त्यामुळे आपल्या समस्या मी आमदार सुनिल राणे (अध्यक्ष गिरणीकामगार शासन समिती )यांच्याकडे मागणी करणार आहे. कोकणातील गिरणी कामगारांना हक्काच घर मिळेल,असे आश्वासन माजी आ. प्रमोद जठार यांनी दिले.गिरणी कामगार शासन समिती अध्यक्ष आमदार सुनील राणे यांचेशी संपर्क साधून ३० नोव्हेंबर रोजी बैठक मुंबईत निश्चित करण्यात आली.

कुडाळ येथील एमआयडीसी शासकीय विश्रामगृहात गिरणी कामगारांच्या घरांच्या बाबतीत असणाऱ्या अडचणी यावर तोडगा काढण्यासाठी सौ रश्मी ताई लुडबे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार तथा लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार उपस्थित होते.

या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांच्या बाबतीत असणारे प्रश्न,  अपूर्ण  कागदपत्र  शासकीय येणाऱ्या अडचणी, या शासनाच्या दरबारी मांडणार असल्याचे आश्वासन जठार यांनी दिले.