अखेर कुडाळ MIDCतील अंधारमय स्मशानभूमी उजाळली !

बाबल गावडे - दीपक गावडे यांचा पुढाकार
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 18, 2024 10:26 AM
views 376  views

कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील महापुरुष ब्राह्मण मंदिरानजीकच्या स्मशानभूमीत गेली अनेक वर्षे लाईट व्यवस्था नसल्याने अडचणी यायच्या. रात्रीच्यावेळी अंत्यविधी करताना नागरिकांची होणारी गैरसोय पिंगुळी माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते बाबल गावडे व व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक गावडे यांनी स्वखर्चातून लाईट व्यवस्था करून गैरसोय दूर केली आहे.

एमआयडीसीचे उपअभियंता श्री रेवणकर व  गावच्या वायरमन कर्मचाऱ्यांनी देखील विद्युत जोडणीसाठी सहकार्य करून सामाजिक कार्यात हातभार लावला आहे.स्मशानभूमी उजेडात आल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.