
लोटे : कोकणात मुसळधार पाऊस पडत असून त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये एक दुर्घटना झाली आहे. आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोटे औद्योगिक वसाहती मधील एक्सेल कंपनीमध्ये एका ठिकाणी प्रक्रिया सुरू असताना रसायन गळती होऊन त्याचा पावसाच्या पाण्यामध्ये संपर्क झाला. परिणामी तयार झालेल्या वायू नजीकच्या लोटे चाळकेवाडी मध्ये पसरला असून त्या ठिकाणी काही जणांना या वायूची बाधा झाली आहे. पाच ते सात जणांना सर्दी डोकेदुखी असा त्रास होऊ लागल्याने त्यांना घरडा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता व्यवस्थापक आनंद पाटणकर यांनी सांगितले की परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून ज्यांना वायूचे बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर लोटे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एक्सल कंपनी समोर ठिय्या करत कंपनी व्यवस्थापनाला या दुर्घटनेस जबाबदार धरले आहे कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.