मायकल डिसोझांचा मंत्री केसरकरांवर जोरदार पलटवार

Edited by: विनायक गावस
Published on: July 29, 2023 15:26 PM
views 176  views

सावंतवाडी : शिक्षण विभागातील अधिकारी ऐकत नाहीत हे केसरकर समर्थकांनी जाहीर करावं, कोणत्या शाळांत पुस्तक मिळाली नाही याची यादी आम्ही देतो असा पलटवार माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी केला. 


माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी शालेय विद्यार्थांना पुस्तक पुरवली जात आहेत. २२ शाळांत पुस्तक मिळाली नाही असं विधान करणाऱ्या ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी ती यादी द्यावी असं आव्हान दिले होते. यावर माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी पलटवार हाणला. शिक्षण विभागातील अधिकारी ऐकत नाहीत हे केसरकर समर्थकांनी जाहीर करावं, कोणत्या शाळांत पुस्तक मिळाली नाही याची यादी देतो असं मत व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.