
वेंगुर्ले : वेंगुर्ला तालुक्यातील वैश्य समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत वितरण कार्यक्रम रविवार दि. २३ जून रोजी सायंकाळी ५.०० वा. साई मंगल कार्यालय येथे होणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गणेश कुशे (उपाध्यक्ष - सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह. पत संस्था मर्या. फोंडाघाट) हे उपस्थित राहणार आहेत.
दहावी परीक्षेत ८० टक्के, बारावी परीक्षेत ७० टक्के गुण मिळविलेल्या आणि पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुण पत्रिकेची झेरॉक्स प्रत राकेश सापळे यांच्या जवळ जमा करावी तसेच शैक्षणिक आर्थिक मदतीचे अर्ज २१ जून पूर्वी भरून द्यावेत. अधिक माहितीसाठी कपिल पोकळे ७२७६८८७७७२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच या कार्यक्रमाला पालक व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वैश्य समाज अध्यक्ष सुनिल डुबळे यांनी केले आहे.