
कणकवली : विद्यामंदिर हरकुळ खुर्द हायस्कूलमध्ये मार्च 2025 मधील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ बुधवार, 30 जुलैला संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक यादव सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच राजन रासम होते. यावेळी हरकुळ खुर्द शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल रासम, गावचे उपसरपंच सर्वेश दळवी, पोलीस पाटील सौ.आरती घाडी, शालेय समिती अध्यक्ष आशुतोष रासम, मुंबई संस्था सभासद गंगाधर रासम, शालेय समिती सभासद अशोक रासम, अनिल सावंत, विद्याधर वालावलकर, मुंबई संस्था सभासद बाबाजी दळवी, विशांत रासम, तानाजी रासम, रोहित घाग, पांडुरंग रासम, धोंडी अण्णा, दत्तात्रय जोशी, राजेंद्र डिचवलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रशालेतून तसेच फोंडाघाट केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळवलेल्या स्वराली विलास भोसले,द्वितीय क्रमांक संध्या दिगंबर तेली, तृतीय क्रमांक कार्तिकी पंढरी डोंगरे यांच्या सह उपसरपंच सर्वेश दळवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबाजी दळवी, विठ्ठल रासम यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सौ. सावंत मॅडम व गांगुर्डे सर, आभार प्रदर्शन श्री. पवार सर यांनी केले.