
देवगड : देवगड मळई येथे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जय बजरंग क्रिकेट क्लब च्या वतीने करण्यात आला.जय बजरंग क्रिकेट क्लबच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील दहावी व बारावी परीक्षेमध्ये यश संपादन करणाèया गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात आला.यावर्षीही शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मळई येथील हनुमान मंदीर येथे बाल मंडळ संगीत मेळा मळई या मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी दहावीत तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त सलोनी संजय मेस्त्री, आर्यन सुहास कणेरकर, महेश पांचाळ, प्रसाद संदीप कणेरकर तसेच बारावीमध्ये देवगड कॉलेजमध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त भुमिका प्रशांत तारी,आकांंक्षा मणचेकर, चैत्राली मणचेकर,भक्ती कणेरकर, खुशी तारी, ओमकार कणेरकर, अनुष्का कणेरकर, सानिका उपरकर, तुषार मेस्त्री, रौजिन शेख, नीती कणेरकर, कुणाल कणेरकर, रिया कणेरकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व रोप देवून सन्मान करण्यात आला.यावेळी मंंडळाचे अध्यक्ष संजय कोळंबकर, उपाध्यक्ष सत्यवान मणचेकर, राजाराम कोयंडे, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर,सौ.स्वाती मेस्त्री, सौ.मृणालीनी भाबल, अंकूश कोयंडे, जनार्दन कोयंडे, मुरारी भाबल, बाळकृष्ण राजम, पंढरीनाथ मणचेकर, जैनुद्दीन जमादार, उमेश भाबल, दिपक सारंग, राजू तारी,नंदकुमार वाडेकर, रूपेश मणचेकर, दिपराज मेस्त्री, देवेंद्र मेस्त्री, संदीप कणेरकर, भुपेश बांदकर, श्रीकांत मेस्त्री ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.