
सावंतवाडी : दिनांक १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून मानवी जीवनात समतोल राखण्यासाठी न्याय सुरक्षा व शैक्षणिक सुविधांचा विकास होण्यास मदत मिळावी, यासाठी दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या मुख्याध्यापिका निर्मला हेसागोल, मर्कझी जमात सावंतवाडी संस्थेच्या उपाध्यक्षा निलोफर बेग यांनी शिक्षक वर्ग यांच्याशी चर्चा करून सदर शाळेच्या नियोजनबद्धतेची माहिती जाणून घेतली.
यावेळी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एकूण चाळीस गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याकरिता शालेय जीवनावर आधारित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटनचे राष्ट्रीय प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष रिजवान बाडीवले, युवक जिल्हाध्यक्ष संजय गावडे, जिल्हा संघटक रामिज मुल्ला, जिल्हा उपसंघटक विष्णू माणगावकर, जिल्हा मीडिया प्रभारी आबिद कितुर, जिल्हा संयोजक परवेज बेग आदी पदाधिकारी उपस्थित होते.