सिंधुदुर्गातील गुणवंत विद्यार्थी - अधिकाऱ्यांचा होणार २२ मे रोजी सत्कार

पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गुणगौरव
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 21, 2025 11:24 AM
views 54  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेमधील कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुका स्तरीय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. हा गौरव समारंभ गुरुवार दि २२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दुपारी २ वाजता पार पडणार आहे. 

इयत्ता १० वी मध्ये मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मधील. आर्या अजित राणे आणि श्रेयश चंद्रशेखर बर्वे आणि  कुडाळ हायस्कूल मधील चैतन्या रुपेश सावंत या तीन विद्यार्थ्यांनी १००टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. स्मितेश विनोद कडुलकर, रेश्मा पालव, विधी विरेंद्र चिंदरकर,  ध्रुव आनंद तेंडुलकर,  हर्षदा किसन हडलगेकर  या पाच विद्यार्थ्यांनी 99.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर नक्षत्रा राजेंद्र काळे या विद्यार्थीनीने ९९.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

तसेच इयत्ता बारावी मधील विज्ञान शाखेतील जाधव अथर्व अतुल, तेंडुलकर मधुकर विवेक, पालव काशीराम विठोबा, कला शाखेतील दळवी तनिषा विनय, कोकरे प्रियंका प्रकाश, मांजरेकर मानसी पांडुरंग तर वाणिज्य शाखेतील भोगटे आयुषी रुपेश, वाळुंजे चित्राली राजेश, परब तनुज निलेश या विद्यार्थ्यांना देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत कोकण विभागामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुकास्तरीय  शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना देखील  पालकमंत्री नितेश राणे यांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे.