कौतुकास्पद उपक्रम | फेरीवाल्यांच्या गुणवंत मुलांचा होणार सन्मान

Edited by: भगवान शेलटे
Published on: July 04, 2024 14:59 PM
views 160  views

सावंतवाडी : हॉकर्स संघटनेच्या वतीने उद्या दिनांक ०५ जुलैला संघटनेच्या सभासदांच्या मुलांना शैक्षणिक व किडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीचा गौरव व कौतुक सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. संघटनेचे सर्व सभासद सावंतवाडी परिसरातील वेगवेगळया गावात आठवडा बाजार करून आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत. अशा कष्टकरी वर्गाच्या मुलांनी विपरीत परिस्थितीत शैक्षणिक व किडा क्षेत्रात मिळविलेले प्राविण्य हे आमच्या संघटनेच्या सर्व सभासदांच्या अभिमानाचा विषय आहे. वंचित घटकातील मुलांचा गुणगौरव करून त्यांना भावी आयुष्यात उज्वळ यश संपादन करण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने या मुलांचा गुणगौरव करण्यासाठी आम्ही कार्यकमाचे आयोजन केले असल्याच्यी भावना संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर यांनी व्यक्त केली.