
दोडामार्ग : धी सावंतवाडी धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई रजि ची सभा ०४ ऑगस्ट २०१४ रोजी मुंबई अंधेरी मधील कार्यालयात संपन्न झाली. सभेला मंडळाचे अध्यक्ष श्री नवल गावडे व सचिव श्री देवेंद्र गावडे तसेच मुंबईमधील सर्व कार्यकारणी पदाधिकारी व दोडामार्ग,सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यासभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यांमध्ये सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम कारण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. या गुणगौरव कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावी मधील विद्यार्थी (७० टक्के किंवा त्यावरील मार्क्स ) इयत्ता बारावी मधील विदयार्थी (६० टक्के किंवा त्यावरील मार्क्स) शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेले विदयार्थी, नवोदय विद्यालयासाठी निवड आलेले विद्यार्थी यांना गौरविण्यात येणार आहे.
सदर विदयार्थ्यांनी आपली गुणपत्रके श्री जानू जवलू पाटील मोजे ९६५७९६७३५५, श्री. लक्ष्मण धोंडू पाटील मोनं. ९४०४७७८३५८ श्री.विठ्ठल लखू कुंभार मो ने. ९४२०१९६०३८ सावंतवाडी तालुका श्री.महेश काळे मो.नं. ९४२०७३८८२४, श्री रमेश शिंदे मो नं. ९४०४७७८८०० यांच्या नंबर वर पाठवावीत. सदर गुणगौरव कार्यक्रम सोमवार दि. ०९ सप्टेंबर २०२४ रोजी संतोषी मंगल कार्यालय बांदा येथे सकाळी वाळते ९ ते दुपारी १ वाजता या वेळेत संपन्न होणार आहे. तसेच याच वेळी मंडळाची अधिमंडळ सभा संपन्न होणार आहे. यावेळी सर्व विदयार्थी, पालक मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व सभासद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धी सावंतवाडी धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई च्या वतीने करण्यात आलय.