रेडी ग्रामपंचायतच्या वतीने १० वी, १२ वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Edited by: दिपेश परब
Published on: July 06, 2023 17:12 PM
views 259  views

वेंगुर्ला : तालुक्यातील रेडी ग्रामपंचायतच्या वतीने गावातील श्री माऊली विद्यामंदिर व मातोश्री पार्वती राऊत विद्यालयातील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तसेच गावातून १२ वी मध्ये प्रथम ३ क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच सन २०२२ - २३ मधील घरदुरुस्ती अनुदान रेडीतील चार लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. 

रेडी ग्रामपंचायतच्या श्री देवी माऊली सभागृहात बुधवारी ५ जुलै रोजी हा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर, सदस्य रश्मी रेडकर, रिचा सावंत, गणेश भगत, आनंद भिसे, मानसी राणे, प्रज्ञा राऊळ, ग्रामविकास अधिकारी गणेश बागायतकर, कर्मचारी वर्ग, यांच्यासाहित ग्रामस्थ प्रतीक्षा तिवरेकर,संजना कनयाळकर, कृपा जोशी, अनंत परब, दीना बागकर, सखाराम रेडकर आदी उपस्थित होते.