
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महाअभियान २०२५ अंतर्गत बांदा शहरातील अभियानासंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बांदा शहर भाजप कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपस्थित राहून अभियानाच्या माध्यमातून होणाऱ्या सदस्य नोंदणीचा आढावा त्यांनी घेतला. तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर,जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, उपसरपंच बाळू सावंत, ग्रा. पं. सदस्य रूपाली शिरसाट, प्रशांत बांदेकर, देवल येडवे, लक्ष्मी सावंत, आबा धारगळकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, मंडल उपाध्यक्ष मधुकर देसाई, माजी सरपंच मंदार कल्याणकर, माजी सभापती शीतल राऊळ यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.