मेहंदी, अंब्रोडरी - ग्लास पेंटींग प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

युवा संदेशच्यावतीने मोफत आयोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 08, 2023 16:57 PM
views 106  views

कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्यावतीने सांगवे ग्रामपंचायत, कनेडी बाजारपेठ येथे महिलांसाठी मोफत  मेहंदी, अंब्रोडरी व ग्लास पेंटींग प्रशिक्षण याचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत प्रशिक्षणाचे उद्घाटन ज्येष्ठ महिला मा सौ अमिता अंकुश सावंत, माजी सरपंच नरडवे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ संजना सावंत, विजय भोगटे, सरपंच संजय सावंत, सानिका गावकर,राजश्री पवार, मयुरी मुंज,मिनल पवार,अंजली शिरसाट ,वैष्णवी सुतार,सौ प्रियाली कोदे आदी मान्यवर उपस्थित होते .

   या प्रशिक्षण वर्गात  १२६ महिला सहभागी झाल्या.हे प्रशिक्षण 10 दिवसाचे असून सोमवार दिनांक ७ ऑगस्ट २०२३ ते शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट २०२३ (शनिवार व रविवार वगळून) दुपारी ३ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गात विवीध प्रकारची मेहंदी, अंब्रोडरी व ग्लास पेंटींग शिकवली जाणार असून प्रशिक्षण वर्गाच्या शेवटी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे  . सर्व महिला उत्साहाने व आनंदाने सहभागी झाल्या. उपस्थित महीलांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते. संदेश सावंत यांनी मनोगतात  गणपती नंतर महिलांसाठी विविध प्रशिक्षण आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.