वन्य प्राणी शेती नुकसान कायदेशीर प्रक्रियेबाबत बैठक

Edited by:
Published on: August 08, 2024 13:58 PM
views 111  views

सिंधुदुर्गनगरी : वन्य प्राणी शेती नुकसान याबाबत कायदेशीर बाबी, नुकसान भरपाई करिता लागणारी प्रक्रिया या संदर्भात सिंधुदुर्ग बँक व स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी तीन ३.३०वाजता जिल्हा बँक सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

सेंटर फॉर सस्टेनेबल, गोखले संस्था पुणे येथे महाराष्ट्रामधील मानव-वन्यजीव संघर्ष अभ्यास आणि त्यावरील शाश्वत तसेच प्रभावी उपाययोजना या प्रकल्पावर काम सुरू झाले आहे. प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट शेतीच्या परिसंस्थे वरील या संघर्षाचा आर्थिक आणि पर्यावरणीय अभ्यासणे आणि त्यावरील उपाय योजना सुचवणे हा आहे.         

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या  वन्यप्राणी नुकसान याबाबत या विषयात गेली ८-१० वर्षे या प्रकल्पामध्ये काम करणारे प्राध्यापक मिलिंद वाटवे, पर्यावरण शास्त्रज्ञ आणि त्यांच्याबरोबर श्रीम. वैदेही दांडेकर या पण मार्गदर्शन करणार आहेत तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून वन्यप्राणी शेती नुकसान भरपाई कायदेशीर रित्या कशी मिळवावी याची प्रक्रिया समजून घ्यावी असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष  दळवी यांनी केले आहे.