
कणकवली : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्याच अनुषंगाने नेत्यांच्या सभा देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये एकाच ठिकाणी म्हणजे कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. ३ मे ला सायंकाळी ६ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी होणार आहे. तर त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ मे ला सायंकाळी ७ वाजता मनसे नेते राज ठाकरे यांची सभा भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी होणार आहे. त्यामुळे कणकवलीत पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. आणि आता एकाच ठिकाणी दोन ठाकरेंच्या वेगवेगळ्या होणाऱ्या सभेमध्ये कोणत्या ठाकरेच्या सभेला किती गर्दी होती हे पहावे लागणार आहे.