श्री देवी पावणादेवी कृपा शिक्षण मंडळाची सभा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 10, 2025 14:19 PM
views 199  views

देवगड : देवगड तालुक्यातील  बापर्डे-जुवेश्वर येथील श्री देवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा बाबुराव वामन राणे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे प्रशालेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. या सभेमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली तसेच नवीन कार्यकारणी देखील यावेळी जाहीर करण्यात आली. 

या सभेमध्ये नियामक समितीचा कार्यकाल (२०२०-२०२५) हा संपल्यामुळे संस्थेच्या नियामावलीनुसार पुढील पाच वर्षाच्या कालावधीकरिता (सन २०२५ - २०३०) नवीन सदस्यांची नेमणूक यावेळी करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांची नावे जाहीर करण्यात आली.बाबुराव वामन राणे – अध्यक्ष , संजय हनुमंत लाड – उपाध्यक्ष १, जेष्ठाराम केशव वेद्रुक – उपाध्यक्ष २, संदिप पायाजी नाईकधुरे – सेक्रेटरी, अजित शंतनुकुमार राणे – सह-सेक्रेटरी १, कृष्णा सहदेव फाळके - सह-सेक्रेटरी २, प्रसाद बाबुराव नाईकधुरे – खजिनदार तर सदस्य सुधीर अनाजी नाईकधुरे, अंबाजी सखाराम राणे,विजय सखाराम गुरव  राजेंद्र नारायण नाईकधुरे,  नंदकिशोर सीताराम तावडे निलेश आप्पा घाडी, सुशील वासुदेव तिर्लोटकर,  संतोष भाऊ नाईकधुरे सदस्य, अविनाश अंकुश घाडी, कांचन किशोर येझरकर,  

यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे सर्वानुमते अभिनंदन करण्यात आले.  संस्थेच्या पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.