
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची ६ नोव्हेंबर रोजी कसाल येथे सभा आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्हा अध्यक्ष अनिल राणे, जिल्हा सचिव गजानन नानचे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सभा न्यू इंग्लिश हायस्कूल, कसाल या प्रशालेमध्ये सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आली असून या सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, राज्य महामंडळाचे एकत्रिकरण झाले असल्याची माहिती देणे, जिल्हा संघटना एकत्रिकरण बाबत चर्चा करणे, शिक्षकेतरांच्या विविध विषयांवर चर्चा करणे, मालवण तालुक्यातील कांदळगाव हायस्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश खोडके यांचा मुलगा जयदीप खोडके यांने विहिरीत बुडालेल्या मुलाला जीवदान देऊन वाचविले असून त्याचा यथोचित गौरव करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहेत. तरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुका अध्यक्ष, सचिव, पदसिद्ध पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.