
सावंतवाडी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने रुग्णोपयोगी वस्तू उपजिल्हा रुग्णालयाला भेट स्वरूपात देण्यात आल्या. या सामाजिक उपक्रमासाठी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी या टिमचं कौतुक केले. तर वैद्यकीय अधिक्षक डॉ. ऐवळींनी सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल आभार मानले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गतवर्षी प्रमाणे यावेळीही रुग्णोपयोगी वस्तू उपजिल्हा रुग्णालयाला भेट स्वरूपात देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, जिल्हा रुग्णालयाचे आरएमओ डॉ. सुबोध इंगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रुग्णांचे कपडे व बेडशीट धुण्यासाठी वॉशिंग मशीन, कपडे सुकवण्यासाठी ड्रायर मशीन, ब्लड प्रयोगशाळेसाठी यू पी एक्स मशीन,सहा फुटी चार बेंच, 30 टेबल, आराम खुर्च्या, डस्टबिन, मग, प्लास्टिक भांडी आदी विविध वस्तू जीवनावश्यक वस्तू उपजिल्हा रुग्णालयास भेट म्हणून देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांची कन्या रुची पेडणेकर हिच्या वाढदिवसानिमित्त पेडणेकर यांच्याकडून सहा फुटी चार बेंच देण्यात आले. तर सामाजिक बांधिलकीकडून 30 टेबल व संस्थेच्या सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, रवी जाधव , सविता टोपले, शरद पेडणेकर, भाजी विक्रेता संदीप, पोलीस प्रसाद कदम यांच्या मोठ्या सहकार्यातून वॉशिंग मशीन देण्यात आली. सीमा मठकर यांच्याकडून कपडे सुकविण्याची ड्रायर मशीन देण्यात आली. जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्याकडून ब्लड बँक साठी युपीएक्स मशीन व आराम खुर्च्या देण्यात आल्या. राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्याकडून 50 किलो वॉशिंग पावडर देण्यात आली. याआधी त्यांनी आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अर्ध्या किंमतीमध्ये इन्व्हर्टर उपलब्ध करून दिला होता. त्यासाठी संस्थेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सामाजिक बांधिलकीच्या सेवाभावी कार्याचा एकच उद्देश आहे की इतरांनी यातून बोध घेऊन अशाच प्रकारे आपल्या गावातील आरोग्य केंद्रामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शासनाकडून ज्या गोष्टी पुरविण्यास विलंब होतो त्यासाठी वाट न पाहत शक्य होईल तेवढ्या रुग्णोपयोगी वस्तू रूग्णालय, आरोग्य केंद्र यांना द्याव्यात असे मत सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे, रवी जाधव, संजय पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक केले. पोलिसांना या टीमच सदैव सहकार्य असतं. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत असं मत व्यक्त केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले. यावेळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, जिल्हा रुग्णालयाचे आरएमओ डॉ. सुबोध इंगळे, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, डॉ. गिरिश चौगुले, डॉ. निखिल अवधूत, डॉ.देसाई, कार्यालयीन अधीक्षक रूपा हेळेकर, सिस्टर उभाळे, राणे, गोसावी, नाईक, मुंगी, तौसीब आगा, अँड. शाबिया आगा, प्रा. सचिन पाटकर, सामाजिक बांधिलकी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव, रूपा मुद्राळे, सुजय सावंत,अशोक पेडणेकर, शरद पेडणेकर, शेखर सुभेदार, शरदनी बागवे, प्रसाद कोदे, विनोद केसरकर, ओमकार दळवी, आनंद भोगळे, संदीप कोलमकर, शितल पेडणेकर, रुची पेडणेकर, शामराव हळदणकर, हेलन निब्रे, शिवा गावडे, पूजा गावडे, संचिता गावडे, ज्ञानेश्वर पारधी, प्रणय गावडे, पूजा निर्गुण, सुकन्या पवार, अमित लिंगवत, सरिता भटकडली आदी उपस्थित होते.