
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन म्हणून कार्यरत असलेले डॉ. गिरीश चौगुले यांची नेमणूक करण्यात आली आहे. सिव्हील सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांनी त्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
दरम्यान, यापूर्वी वैद्यकीय अधीक्षक पदावर कार्यरत असलेले स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी प्रकृती अस्वास्थामुळे या पदाचा कार्यभार अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार ही नेमणूक करण्यात आली आहे.डॉक्टर गिरीश चौगुले जनरल सर्जन हे सांगली जिल्ह्यातील असून अनेक वर्षे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जनरल सर्जन म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांची नव्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक म्हणून सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील यांनी नव्याने नेमणूक केली आहे.