
देवगड : देवगड मेडिकल फाउंडेशन डॉ. आठवले कॅम्पस येथे लाईफ लाईन फाउंडेशनतर्फे वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. या वैद्यकीय शिबिरात एकूण 60 रुग्णांनी भाग घेतला. रत्नागिरी येथील प्रख्यात न्युरो सर्जन डाॅ. विजय फडके, अस्थिरोग तज्ञ डॉ. तन्मय आठवले यांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. आवश्यक त्या रुग्णांची सवलतीच्या दरात चिकित्सा करण्यात आली. भविष्यात लाईफ लाईन फाउंडेशनतर्फे अशाच स्वरूपाचे अनेक उपक्रम राबविण्यात येतील, असे डॉ. सुनील, डॉ. सौ मंजुषा आठवले यांनी जाहीर केले.