सावंतवाडी : सावंतवाडी मधील सेंटर फॉर एज्युकेशन टेक्नॉलॉजी अँड हेल्थ संचलित वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अँड रिसर्च, सावंतवाडीमध्ये बुधवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी फिनोलेक्स कॉलेज, रत्नागिरी यांचेमार्फत एमसीए प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम व भविष्यातील नोकरीच्या संधी याबद्दल प्राध्यापक श्री. परुळेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. पुष्पराज सावंत यांनी केले तर आभार सहा. प्रा.सानिका दळवी यांनी मानले.